माहेश्वरी विद्या प्रचारक मंडळ, पुणे संचलित

(हिंदी भाषिक अल्पसंख्यांक संस्था)

दमाणी विद्या मंदिर,सोलापूर

स्थानीय संचालक मंडळ

मनोगत


स्थानीय अध्यक्ष


श्री. नंदकिशोरजी भराडिया

दमाणी विद्या मंदिर’ ही  सोलापुर मधील नामांकित शाळांमध्ये अग्रणी असणारी मराठी माध्यमाची शाळा.

माहेश्वरी विद्या प्रचारक मंडळ, पुणे या संस्थेच्या  अनेक शाखांपैकी ही  एक शाखा आहे. या शाखेबरोबरच महेश व एस.आर.चंडक इंग्लिश स्कूल, डी. एच.बी. सोनी महाविद्यालय या सोलापूर मधील शाखा, मुलुंड(मुंबई) येथे मुलांचे वसतीगृह, पुणे येथे मुलामुलींसाठी स्वतंत्र वसतीगृहे, मराठी व इंग्रजी माध्यमाच्या दोन शाळा, अहमदनगर येथे मुलांचे वसतीगृह या संस्थेच्या शाखा कार्यरत आहेत.

‘तमसो मा ज्योतिर्गमय’ या ब्रीदवाक्यप्रमाणेच प्रत्येक विद्याथ्याच्या जीवनात ज्ञानाची ज्योत तेवत ठेवण्यासाठी आमची संस्था सन १९२९ पासून सदैव कटीबद्ध आहे. संस्थेचे सर्व सदस्य या पवित्र शिक्षण क्षेत्रात यथाशक्ती आपले योगदान देऊन आपली सामाजिक जबाबदारी पेलत आहेत. या सर्वांच्या सहकार्यानेच संस्थेचे नाव उज्वल होत आहे.

दमाणी विद्या मंदिर मध्ये विविध उपक्रम, प्रत्यक्षअनुभूती, आधुनिक तंत्रज्ञानयाद्वारे विध्यार्थ्यांना सक्षम बनवले जात आहे. सर्वांच्या एकत्रीकरणातून संस्कारी व जबाबदार सुसंस्कृत व्यक्तिमत्वाची जडणघडण होत आहे.

या सर्वांचा परीपाक म्हणहेच आमचे विध्यार्थी या एकविसाव्या शतकातील आव्हाने पेलून स्पर्धेत टिकून राहतात एवढेच नव्हे तर विविध क्षेत्रात आपले विशिष्ट स्थानही निर्माण करत आहेत. उच्चं पदावर कार्यरत आहेत आम्ही या सर्वांचा आवर्जून उल्लेख करतो.

संस्थेच्या जेष्ठ पदाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाने व माझ्या सहकारी संचालकांसमवेत आम्ही आमचे कार्य करत आहोत.मी दमाणी विद्या मंदिर या शाळेचा अध्यक्ष या नात्याने काम करत आहे याचा मला सार्थ अभिमान वाटतो.

धन्यवाद !

BHUTADA
श्री. गिरीधारीलालजी भुतडा उपाध्यक्ष/पदेन सदस्य मा.वि.प्र.मंडळ, पुणे
NOGAJA
श्री. नयनजी नोगजा स्थानीय सचिव
JAJU
श्री. कालिदासजी जाजू सहसचिव
DAMANI
श्री. नवरतनजी दमाणी सदस्य
DAMANI
श्री. राजेशजी दमाणी सदस्य
DAMANI
श्री. वेणूगोपालजी तापडिया सदस्य
LAHOTI
श्री. गोविंदप्रसादजी लाहोटी सदस्य
BHUTADA
श्री. रमेशजी भुतडा सदस्य
TOSHNIWAL
सी. ए. श्री. अतुलजी तोष्णीवाल सदस्य
TAPDIYA
श्री. उज्वलजी तापडिया सदस्य
RATHI
सौ. मंजुषाजी राठी सदस्या
KABARA
सौ. मंगलजी काबरा सदस्या
LAHOTI
श्री. सुहासजी लाहोटी निमंत्रित सदस्य
Share with friends