सन १९४५ साली स्थापन झालेली. स्वातंत्र्यपूर्व कालखंडापासून शिक्षण क्षेत्रात अविरत कार्यरत असलेली आमची संस्था हि सोलापुरातील विख्यात आणि प्रथितयश अश्या शैक्षणिक संस्थांपैकी एक आहे. शिक्षणाचा सर्वोत्तम पर्याय म्हणून दमाणी विद्या मंदिराकडे पहिले जाते.

बदलत्या काळासोबत आधुनिक तसेच कसदार शिक्षण पद्धती. प्रोजेक्टर द्वारा स्मार्ट शिक्षण. संगणक लॅब द्वारा शालेय वयातच संगणक हाताळण्याचा कौशल्य विकास उपक्रम. विविध उपकरणांनीयुक्त वैज्ञानिक प्रयोगशाळा, पुस्तकी ज्ञानाबरोबर प्रत्यक्ष प्रात्यक्षिकांवरही भर. बौद्धिक विकासासह शारीरिक विकासासाठी योगा तसेच मैदानी कवायत यांचा सराव. खेळांसाठी प्रशस्त मैदानासह दर्जेदार स्पोर्ट्स साहित्याची उपलब्धी.

उच्च शैक्षणिक मानक

सोलापूर शहरातील आदर्श शैक्षणिक संकुल म्हणून प्रसिद्ध असलेली दमाणी शिक्षण संस्था नेहमीच कालानुरूप उत्कृष्ठ ज्ञानदानाचे कार्य करीत आली आहे. आम्ही स्वीकारलेली शैक्षणिक तथा इतर उपक्रमे हि नेहमीच काळाच्या कसोटीवर पारखून-निरखून स्वीकारली गेलेली आहेत. आमची प्रत्येक उपक्रमे हे त्यांच्या निर्धारित मानांकनावर खरी उतरतात की नही ते पारखण्यासाठी तज्ञांचा गट सदैव लक्ष ठेवून असतो.

अंगभूत कलांगुणांचा विकास

पारंपारिक पुस्तक केंद्रित शिक्षणाच्या चौकटी बाहेर पडत आम्ही विद्यार्थी केंद्रित विविधांगी शिक्षण प्रणालीचा अवलंब केला आहे. विद्यार्थ्यास त्याच्या आवडीनूसार स्वतःची अभ्यास पद्धती निवडता यावी, हा त्यामागचा मुख्य उद्देश. ह्या उपक्रमा अंतर्गत घडत असेलेला विद्यार्थी हा अधिक उत्साही आणि विविध कौशल्यातही अधिक तरबेज बनत असल्याचे अनुभवास येत आहे.


निपुण शिक्षकवृंद

शिक्षक हा शाळारूपी वृक्षाचा मूळ असतो. अनुरूप आणि सशक्त मूळ हे डेरेदार वृक्षाचे द्योतक आहे. याप्रमाणे ज्ञानी आणि निपुण शिक्षक हा सशक्त शिक्षण प्रणालीचा द्योतक असतो. यालाच अनुसरून विद्यार्थांना सकस आणि काळाच्या कसोटीवर कसलेला अर्थपूर्ण ज्ञानार्जन करता यावे याकरिता आमचे शिक्षकवृंदही काळानुरूप कला-कौशल्य आत्मसाथ करीत असतात. जेणेकरून या साच्यात तयार झालेला विद्यार्थी हा त्याच्या भावी जीवनात स्वतःला विनासायास सिद्ध करू शकेल.

समाजसेवेचे संस्कार

विद्यार्थीदशेतून बाहेर पडताच, धडपड सुरु होते ती स्वतःची ओळख निर्माण करण्याची. ह्या धडपडीत व्यक्ती व्यावहारिक जीवनाच्या चौकटीत नकळत बंधिस्त होतो. पर्यायाने, तो समाजाचा काही देन लागतो, हे विसरतो. म्हणूनच, आम्ही कोवळ्या वयातच विध्यार्थ्यांना समाजसेवेची महत्व पटवून देतो. यांतर्गत परिसर स्वच्छता कार्यक्रम, गरजू विद्यार्थ्यांना मदत करने, अपंग तथा वृद्धांना रस्ता ओलांडण्यास मदत करने, असे अनेक उपक्रम राबविले जातात.

 
छत्री पावसाला थांबवू शकत नाही; पण पावसात थांबण्याचे धाडस नक्की देऊ शकते. यासमच दमाणी शिक्षण संस्था विद्यार्थ्यांना वास्तविक जीवनांत उपयोगी पडेल असेच शिक्षण-संस्कार करण्यास कटीबद्ध आहे.

आम्ही माहेश्वरी विद्या प्रचारक मंडळ, पुणे यांचा भाग आहोत .

ज्ञानदानाच्या पवित्र कार्यास समर्पित समूह..


आमच्या शैक्षणिक प्रवासाची सुरवात स्वातंत्र्य पूर्व काळापासून एका वस्तीगृहापासून सुरु झाली. सदर वस्तीगृहासाठी स्वर्गीय सेठ रामसुखजी संतोकीरामजी चंडक यांचे अमूल्य योगदान लाभले. या वस्तीगृहानेच आजच्या दमाणी शिक्षण समूहाची मुहूर्तमेढ रोवली. स्वातंत्र्यपूर्व काळाच्या प्रतिकूल काळातही शिक्षणाची भविष्यातील गरज ओळखून सुरु केलेली हि संस्था म्हणजे दूरदृष्टीचा उत्तम नमुना होय.

सन १९४५ मध्ये प्राथमिक शाळेची सुरवात झाली. ह्या शाळेच्या स्थापनेतही चंडक परिवाराचा सिंहाचा वाटा होता. सध्या हि प्राथमिक शाळा श्रीमती गोपीबाई दमाणी बालक मंदिर यानावाने प्रसिद्ध आहे.

सन १९६८ मध्ये स्व. सेठ भैरुरतनजी दमाणी यांच्या मुक्तहस्त देणगीने सदर शिक्षण संस्था दमाणी विद्या मंदिर ह्या सामुहिक नावाने सर्वश्रुत झाली. त्यांतर्गत प्राथमिक शाळेचे नामकरण श्रीमती मथुराबाई दमाणी प्राथमिक शाळा असे झाले. तसेच प्रशालेचे नामकरण श्री भैरुरतनजी दमाणी प्रशाला असे करण्यात आले.

अश्या ह्या दैदिप्यमान शैक्षणिक घौडदौडीचे आताचे हे ७३वे वर्ष. उत्तरोतर शैक्षणिक कार्याचा वसा अधिक व्यापक होत जाऊन आज हजारो विद्यार्थी शिक्षण संकुलाच्या पंखाखाली घडले आहेत. याचा आम्हास अभिमान वाटतो.

4

शैक्षणिक संकुल


1541

विध्यार्थी क्षमता


70

शिक्षक वृंद


4046चौ.मी.

संकुलाचा विस्तार