काही ठळक वैशिष्टे..!
आमच्या शिक्षण प्रांगणात घडणारा प्रत्येक विद्यार्थ्यास मानसिक, भावनिक, सामाजिक आणि आध्यात्मिकरित्या सुसज्ज करणे, हे आमचे प्रमुख ध्येय. आम्ही उत्कृष्ट पूर्व-प्राथमिक, प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण प्रदान करतो आणि गेल्या ७३ वर्षांपासून शिक्षण क्षेत्रात कार्यरत आहोत.
- निपुण शिक्षकवृंद
- सर्व सुविधांयुक्त प्रांगण
- ज्ञानरचनावादी शिक्षण
आमचा विश्वास
विद्यार्थ्यांना फक्त फक्त शैक्षणिकदृष्ट्याच नव्हे तर व्यवहार ज्ञानानेही पुढे ठेवण्याचा आमचा प्रयत्न असतो. जेणेकरून शाळेतील अनुभवाची शिदोरी त्यांना उद्याचा जबाबदार आणि कर्तुत्वान नागरिक बनवू शकेल.
तसेच विविध खेळ, कौशल्य शिबीर, समाजसेवा आणि विविध प्रदर्शन यांचे आम्ही वेळोवेळी आयोजन करीत असतो.
विद्यार्थी कट्टा
ठळक घडामोडी
१६ फेब्रुवारी २०१९दहावीचा निरोप समारंभ
यंदाच्या २०१८-१९ च्या दहावीच्या विद्यार्थ्यांचा शनिवार दि.१६/०२/२०१९ रोजी निरोपसमारंभाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला पाहुणे म्हणून डॉ. सौ. दीपाली काळे लाभले होते.९ जानेवारी २०१९ वार्षिक स्नेहसंमेलन
आमची शाळा आपल्या पाल्यासाठी सर्वोत्तम पर्याय
शिक्षण जेथे दैवत
दमाणी विद्या मंदिर, जिथे विद्यार्थ्याना वास्तविक जीवनातील प्रतिभेशी ओळख करून देण्याचा प्रयत्न केला जातो..! आपल्या पाल्याचा सर्वांगीण विकास करणे, हाचं आमच्या शैक्षणिक संकुलाची पुंजी आहे.
मुलांच्या आवडीनुसार त्यांना त्या द्रुष्टीने विविध साधन, खेळ आणि साहित्य उपलब्ध करून दिली जातात. विद्यार्थ्यांच्या इतर कलागुणांना न्याय देण्यासाठी त्या-त्या विषयाच्या तज्ञ शिक्षकांची नेमणूक केली जाते. जेणेकरून त्यांचे आजचे कौशल्य उद्याचा जीवनाची शिदोरी बनू शकेल.