ई-लर्निंग

आकलनास सोपी

चित्रफीत आणि ध्वनी माध्यमाद्वारे दिले जाणारे शिक्षण हे पारंपारिक शिकवण पद्धतीपेक्षा तुलनेने अधिक सरस आणि कळण्यास खूप सोपी असतात.

मनोरंजनातून शिक्षण

अॅनिमेशनवर आधारित शिक्षणामुळे विद्यार्थी हसत-खेळत शिकतात. साहजिकच त्यांच्यात शिक्षनाप्रतीची ओड आपोआप वृद्धिंगत होऊ लागते.

तंत्रज्ञानाची ओळख

आधुनिक शिक्षण पद्धती मुळे विद्यार्थ्यांना बालवयातच आधुनिक तंत्रज्ञानाची ओळख करून देणे सोप्पे होते. मुलांमधील जिज्ञासा आकार धरू लागते.

प्रयोगशाळा

स्वयंअध्ययन क्षमता

लेखी आणि पठण अभ्यास पद्धतीपेक्षा प्रात्यक्षिक पद्धतीवर आधारित शिक्षण हे अधिक सकस व समजण्यास सोपे असते.

विषयाचे सखोल ज्ञान

केवळ क्रमिक पुस्तकातील मर्यादित माहितीवर अवलंबून न राहता, विद्यार्थ्यांना विविध प्रयोगाद्वारे विविध पैलूंचा बारीकिनी अभ्यास करता येतो.

वैज्ञानिक गुणांचा विकास

विविध प्रयोग करता करता नकळतच विद्यार्थांमधील वैज्ञानिक घडत जातो. पर्यायाने तो विविध गोष्टींचा वैज्ञानिक दृस्ठीने विचार करू लागतो.

सुरक्षाहेतु ४४ सीसीटीव्ही कॅमेरांद्वारे निगराणी

संगणक लॅब

कौशल्य आणि ज्ञानाची पेटार

विद्यार्थी दशेतच संगणक हाताळण्याचा आत्मविश्वास वृदिंगत होतो. डिजिटल भारतासाठी पोषक वातावरण निर्मिती करण्यास संगणक ज्ञान अत्यंत अनुकूल आहे.

उत्स्फुर्थ ज्ञानग्रहण

नेहमीच्या तुलनेत संगणकाद्वारे शिकवताना विद्यार्थी अत्यंत तल्लीन होऊन शिकतात. दृक-श्राव्य तथा अनिमेशन आधारित माहिती ते त्वरित आत्मसात करतात.

ज्ञानाची शाश्वत खान

विकिपीडिया तथा तत्सम वेबसाईटच्या सहाय्याने विद्यार्थ्यांना माहिती सहज उपलब्ध होते. ई-बुकांमुळे त्यांना पुस्तकांवरील खर्चात बचत होते.

ग्रंथालय

विपुल ग्रंथसंपदा

विविध विषयांवरील हजारो पुस्तके विद्यार्थ्यांना दमाणी विद्या मंदिराद्वारे उपलब्ध करून देण्यात आली आहेत. विद्यार्थ्यांना बहुआयामी ज्ञान मिळवून देण्यास पुस्तके हे उत्तम माध्यम आहे.

पुस्तके निवडण्यास मार्गदर्शन

विद्यार्थ्यांची आवड-निवडीचा सातत्याने अभ्यास करून आमचे ग्रंथपाल त्यांना अपेक्षित पुस्तके निवडण्यास मदत करतात.

वर्तमानपत्र वाचन

चालू घडामोडींचे आकलन व्हावे ह्या हेतूने विद्यार्थ्यांना वर्तमानपत्र उपलब्ध करून देण्यात आले आहे.

प्रशस्त मैदान

विविध खेळांचा विकास

प्रत्येक विद्यार्थ्यांमध्ये कुठल्या ना कुठल्या खेळाची अंगभूत कला असते. गरज आहे ती फक्त त्या कलेला व्यक्त करण्याची, त्यास प्रशस्त मैदानापेक्षा आणखी कुठली गोष्ट चांगली असू शकते?

शारीरिक कसरत

आताच्या स्मार्टफोन युगातील एकाच ठिकाणी बसून राहण्याची सवय सोडवायची असेल तर मैदानी खेळ हे रामबाण पर्याय ठरेल.

आरोग्यदायी

खेळांद्वारे होणाऱ्या विविध हालचालींद्वारा शारीरिक व्यायाम आपोआप घडला जाऊन नैसर्गिकरित्या शरीर मजबूत होण्यास मदत मिळते.
Damani Ground
Share with friends