माहेश्वरी विद्या प्रचारक मंडळ, पुणे संचलित
(हिंदी भाषिक अल्पसंख्यांक संस्था)
दमाणी विद्या मंदिर,सोलापूर
मनोगत
स्थानीय अध्यक्ष
श्री कालिदासजी जाजू
मनोगत
स्थानीय अध्यक्ष
श्री कालिदासजी जाजू
दमाणी विद्या मंदिर ही सोलापूरमधील अग्रगण्य मराठी माध्यमाची शाळा आहे.
माहेश्वरी विद्या प्रचारक मंडळ, पुणे या संस्थेच्या अनेक शाखांपैकी एक असून, याच संस्थेच्या विविध शाखांमध्ये महेश आणि एस. आर. चंडक इंग्लिश स्कूल, डी. एच. बी. सोनी महाविद्यालय (सोलापूर), मुलुंड (मुंबई) येथे मुलांचे वसतीगृह, पुण्यात मुलामुलींसाठी स्वतंत्र वसतीगृहे, तसेच मराठी व इंग्रजी माध्यमाच्या शाळा आणि अहमदनगर येथे मुलांचे वसतिगृह कार्यरत आहेत.
‘तमसो मा ज्योतिर्गमय’ या ब्रीदवाक्यानुसार संस्थेने १९२९ पासून ज्ञानाची ज्योत विद्यार्थ्यांच्या जीवनात तेवत ठेवण्यासाठी कटीबद्ध कार्य केले आहे. संस्थेचे सर्व सदस्य आपापल्या यथाशक्तीने पवित्र शिक्षणक्षेत्रात योगदान देत आहेत, ज्यामुळे संस्थेचा लौकिक दिवसेंदिवस वाढत आहे.
दमाणी विद्या मंदिरात विविध उपक्रम, प्रत्यक्ष अनुभव आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून विद्यार्थ्यांना सक्षम बनवले जाते. या सर्व प्रयत्नांतून विद्यार्थ्यांची संस्कारी आणि सुसंस्कृत व्यक्तिमत्वाची जडणघडण होते.
याचा परिणाम असा की आमचे विद्यार्थी इक्कीसाव्या शतकातील आव्हानांना यशस्वीपणे सामोरे जात आहेत, स्पर्धेत टिकून राहतात आणि विविध क्षेत्रांमध्ये स्वतःचे वेगळे स्थान निर्माण करत आहेत. उच्च पदांवर कार्यरत असलेल्या आमच्या विद्यार्थ्यांचा आम्हाला अभिमान आहे.
संस्थेच्या ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि माझ्या सहकारी संचालकांसोबत आम्ही आमचे कार्य यशस्वीरित्या करत आहोत. दमाणी विद्या मंदिरच्या अध्यक्षपदावर काम करण्याचा मला खूप अभिमान आहे.
धन्यवाद!