माहेश्वरी विद्या प्रचारक मंडळ, पुणे संचलित

(हिंदी भाषिक अल्पसंख्यांक संस्था)

बी. एफ. दमाणी प्रशाला

माध्यमिक व उच्च-माध्यमिक विभाग

मनोगत

सौ. आर. एन. पेंबर्ती

मुख्याध्यापिका

‘तमसो मा ज्योतिर्गमय’ या ध्येयाने प्रेरित होऊन ‘माहेश्वरी विद्या प्रचारक मंडळ, पुणे’ या संस्थेने इ.स. १९४४ मध्ये सोलापूरात दमाणी विद्या मंदिरची स्थापना केली. इवलेसे रोप लावियले द्वारी, त्याचा वेलू गेला गगनावरी, बघता बघता या रोपाचे वटवृक्षात रुपांतर झाले आणि अमृतमहोत्सवाकडे त्याची वाटचाल सुरु आहे.

सोलापूर शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी शाळेची तीन मजली इमारत मोठ्या दिमाखात उभी आहे. नर्सरी ते इ. १०वी पर्यंत सुमारे १५०० विद्यार्थी येथे ज्ञानार्जन करीत आहेत.

विद्यार्थ्यांसाठी अत्याधुनिक सोयी सुविधांनी शाळेची इमारत सजलेली आहे. इ. १ ली ते इ. १० वी पर्यंतच्या सर्व स्मार्ट वर्गात अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने अध्यापन केले जाते. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे, उत्तम आरोग्यासाठी अत्याधुनिक आर. ओ. वॉटर प्यूरिफायरची सोय आहे. वैज्ञानिक उपकरणांनी सुसज्ज अशी प्रयोगशाळा, नवनवीन तंत्रज्ञाना आत्मसात करण्यासाठी संगणक कक्ष तसेच विविध खेळ खेळण्यासाठी आणि क्रीडा प्रकारांचा सराव करण्यासाठी शाळेचे मैदानही उपलब्ध आहे. विद्यार्थ्यांची वाचन अभिरुची संपन्न करण्यासाठी शाळेचे ग्रंथालयही सज्ज आहे.

विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकास हाच आमचा ध्यास असल्यामुळे शाळेमध्ये विद्यार्थ्यांचा बौद्धिक, शारीरिक आणि मानसिक विकास होण्यासाठी शैक्षणिक व सामाजिक उपक्रम आयोजित केले जातात. शासनातर्फे इ. १ ते इ. ८ वी च्या विद्यार्थ्यांसाठी घेतल्या जाणाऱ्या पायाभूत व संकलित चाचण्या व्यतिरिक्त सर्व विषयांची सराव परीक्षा प्रत्येक महिन्यात घेतली जाते. व पालकांना पाल्याची प्रगती कळविण्यात येते. शासनातर्फे घेतली जाणारी इ.५ वी आणि इ. ८ वी साठीची शिष्यवृत्ती परीक्षा, एम.टी.एस., सायन्स-मॅथस्, सायबर ऑलिंपियाड, डॉ. होमी भाभा विज्ञान परीक्षा इ. परीक्षांमध्ये शाळेचे विद्यार्थी उत्तुंग यश मिळवितात. विद्यार्थ्यांच्या उत्तम करियरसाठी आय.आय.टी. फौंडेशनच्या तासांचे आयोजन हि शाळेमध्ये केले जाते.

अप्रगत विद्यार्थ्यांना जलद प्रगत शिक्षण प्रवाहात आणण्यासाठी शाळेच्या वेळेव्यतिरिक्त जादा तासांचे आयोजन केले जाते. विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळावा म्हणून हस्ताक्षर, चित्रकला, निबंध, मेहंदी, रांगोळी इ. अंतरवर्गीय स्पर्धा घेतल्या जातात. शहर पातळीवर भव्य वकृत्व स्पर्धांचे आयोजनही शाळेमध्ये केले जाते.

विविध स्पर्धा परीक्षेमध्ये यशस्वी होणा-या विध्यार्थ्यांचा व खेलाडूंचा गुणगौरव क्रीडा सप्ताहामध्ये तसेच वार्षिक पारितोषिक वितरण समारंभात केला जातो. गुणवंत विद्यार्थ्यांचा हा गौरव इतर विद्यार्थ्यांना प्रेरणादायी ठरतो.
शाळेच्या प्रगतीमध्ये शिक्षक तसेच पालकांचाही सिंहाचा वाट असतो. या सोशल मिडीयाच्या काळात पाल्य आणि पालक यांच्यात सुसंवाद घडावा म्हणून पालकांसाठी पालक मेळावा, व्याख्याने इ. उपक्रम आयोजित केले जातात. आजच्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या जगात विद्यार्थ्यांमध्ये ‘सामाजिक जाणीव’ निर्माण व्हावी म्हणून काही सामाजिक उपक्रम देखील शाळेमध्ये राबविले जातात.

आजचा विद्यार्थी या देशाचा भावी नागरिक आधुनिक तंत्रज्ञानाने परिपूर्ण, शिस्तबद्ध व संस्कारी असावा यासाठी या शाळेत कार्यरत असलेले शिक्षक सदैव मार्गदर्शनासाठी सज्ज असतात. प्रेरणादायी संस्थाचालक, तज्ञ शिक्षक, गुणी व मेहनती विद्यार्थी, सहकार्य करणारे पालक यांच्या प्रयत्नांमुळे हा ‘ज्ञानदीप’ सदैव तेवत राहो हि सदिच्छा..!

शिक्षकवृंद

प्रेरकः सूचकश्वैव वाचको दर्शकस्तथा । शिक्षको बोधकश्चैव षडेते गुरवः स्मृताः ॥
R P Ingale
आर पी इंगळे पर्यवेक्षक
P L Patil
पी एल पाटील सहशिक्षक
L A Dalavi
एल ए दळवी सहशिक्षक
S A Jadhav
ए एस जाधव सहशिक्षिका
S N Hudge
एस एन हुडगे सहशिक्षिका
S A Sarade
एस ए सरडे संगणक शिक्षिका
R P Ingale
व्ही ए अवाशंक सहशिक्षिका
S R Fulari
एस आर फुलारी सहशिक्षक
A M Madade
ए एम मदडे सहशिक्षक
S Y Indikar
एस वाय इंडीकर सहशिक्षिका
S Allimore
एस अळळीमोरे सहशिक्षक
A A Shelke
ए ए शेळके सहशिक्षिका
G B Mhamane
जी बी म्हमाणे सहशिक्षक
S Moholkar
एस मोहोळकर सहशिक्षिका
Thombare
जे ठोंबरे सहशिक्षक
V R MARGUR
व्ही आर मरगुर प्रयोगशाळा सहाय्यक
H B Jamdar
एच बी जामदार सहशिक्षक
S V Kulkarni
एस व्ही कुलकर्णी सहशिक्षक
S V Katare
एस व्ही कटारे सहशिक्षिका
V A Raut
वि ए राऊत सहशिक्षिका
M N Nikte
एम एन निकते सहशिक्षिका

कार्यालयीन वृंद

सत्येन धार्यते पृथ्वी सत्येन तपते रविः । सत्येन वायवो वान्ति सर्वं सत्ये प्रतिष्ठितम् ॥
K S Mane
एस एस माने वरिष्ठ लिपिक
जी डिगे कनिष्ठ लिपिक

सेवकवृंद

परोपकाराय फलन्ति वृक्षाः परोपकाराय वहन्ति नद्यः । परोपकाराय दुहन्ति गावः परोपकारार्थ मिदं शरीरम् ॥
M K Pawar
एम के पवार शिपाई काका
V A Gophane
वि ए गोफणे शिपाई काका