
क्रांतीसूर्य उपक्रमशील संस्था
September 13, 2019
स्मृतिगंध सोहळा
January 8, 2020आज दमाणी विद्या मंदिराच्या मैदानात इयत्ता तिसरीत व चौथी मध्ये खूप चुरशीचा सामना झाला. #BEST_VS_BEST या सामन्यात पहिल्यांदाच इयत्ता तिसरी च्या विद्यार्थ्यांनी इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांवर 10 धावांनी विजय मिळवला.
पहिल्यांदाच सुपर ओव्हर च्या नियमाने सामन्याचा निकाल देण्यात आला. यात इयत्ता तिसरी ने नाणेफेक जिंकून इयत्ता चौथीला प्रथम फलंदाजी करण्यास निमंत्रण दिले. चौथीच्या संघाने धडाकेबाज फलंदाजी करत 7 षटकात 4 बाद 48 धावा केल्या. याला प्रतिउत्तर देत तिसरीच्या संघाने तडफदार फलंदाजी करत 7 षटकात 48 धावा केल्या. आणि सामना बरोबरीचा झाला. पण सुपर ओव्हर मध्ये इयत्ता तिसरीने 6 चेंडूत 14 धावा करत इयत्ता चौथी समोर धावांचा डोंगर उभा केला.
अखेर तिसरीच्या उत्कृष्ट खेळा मुळे हा सामना तिसरीच्या मुलांनी जिंकला. या सामन्याला लेग अंपायर म्हणून Mallinath Jmkhandi Sir आणि अंपायर Sheetalkumar Shinde Sir यांनी काम पाहिले.
या सामन्याला लेग अंपायर म्हणून Mallinath Jmkhandi Sir आणि अंपायर Sheetalkumar Shinde Sir यांनी काम पाहिले.




