इ. १० वी गुण गौरव समारंभ

योग दिन ( म. फ. दमाणी विद्या मंदिर)

June 20, 2026

इ. ५ वी कार्यशाळा

July 11, 2026

इ. १० वी गुण गौरव समारंभ

दमाणी प्रशालेत दहावी गुणवंत विद्यार्थी पारितोषिक वितरण समारंभ संपन्न

माहेश्वरी विद्या प्रचारक मंडळ, पुणे संचलित बी.एफ. दमाणी प्रशालेत एस.एस.सी परीक्षा मार्च-2026 मध्ये विशेष प्राविण्य प्राप्त गुणवंत विद्यार्थ्यांचा पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात संपन्न झाला. सदर समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून प्रशालेचे माजी विद्यार्थी C.A. मा.श्री. शुभमजी नोगजा यांची उपस्थिती होती. समारंभाची सुरुवात सरस्वती पूजन व दीपप्रज्वलनाने झाली. उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते गुणवंत विद्यार्थ्यांना पारितोषिके देऊन गौरविण्यात आले.समारंभाचे प्रमुख पाहुणे C.A. मा.श्री. शुभमजी नोगजा यांनी गुणवंत विद्यार्थ्यांना जिद्द, चिकाटी, कठोर परिश्रम व प्रयत्नातील सातत्य राखत जीवनात यशस्वी होण्याचे आवाहन केले. तसेच शाळा व शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त करून शाळेच्या प्रगतीबाबत गौरवोद्गार काढले. 100% गुण प्राप्त करून प्रशालेत प्रथम येण्याचा बहुमान पटकावलेल्या कु. सई पिंपळनेरकर व चि. अर्णव राऊत या विद्यार्थ्यांनी शाळेप्रती कृतज्ञता व्यक्त करून शाळेचा नावलौकिक वाढवण्याची ग्वाही दिली. सदर समारंभास संस्थेचे स्थानीय अध्यक्ष मा.श्री.कालिदास जाजू, सचिवा मा.सौ. मंगल काबरा, सहसचिव मा.श्री.अमितजी मर्दा, संस्थेचे सन्माननीय पदाधिकारी,प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ.रेखा पेंबर्ती,पर्यवेक्षक श्री.राहुल इंगळे, दानदाते, पालक व गुणवंत विद्यार्थी उपस्थित होते. समारंभाचे प्रास्ताविक श्री. प्रभानंद पाटील यांनी केले. प्रमुख पाहुण्यांचा परिचय श्री. श्रीराम फुलारी यांनी करून दिला. शिक्षक मनोगत श्री. समीर कुलकर्णी यांनी मांडले. पारितोषिक प्राप्त विद्यार्थ्यांचे यादीवाचन सौ. ईशा शिरसीकर यांनी केले. समारंभाचे सूत्रसंचालन सौ.शिरीन इंडिकर यांनी केले तर आभार श्री. अंकुश मदडे यांनी मानले. समारंभाच्या यशस्वीतेसाठी शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.