योग दिन (बी. एफ. दमाणी प्रशाला, सोलापूर)

प्रवेशोत्सव २०२६ (पूर्व प्राथमिक विभाग)

June 15, 2026

योग दिन ( म. फ. दमाणी विद्या मंदिर)

June 20, 2026

योग दिन (बी. एफ. दमाणी प्रशाला, सोलापूर)

बी. एफ. दमाणी प्रशालेत आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा.

माहेश्वरी विद्या प्रचारक मंडळ पुणे संचालित, बी. एफ. दमाणी प्रशालेत 12 वा आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सर्वप्रथम कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या व योग प्रशिक्षिका कु. सारा थोबडे यांनी विविध योगासनाच्या स्पर्धांविषयी विद्यार्थ्यांना माहिती दिली. त्याचबरोबर उभ्या व बैठ्या स्थितीतील आसने घेतली. तसेच एकाग्रता साधण्याच्या दृष्टिने प्राणायमाचा सराव घेतला. क्रीडा प्रशिक्षक श्री. शितलकुमार शिंदे व श्री. पवन भोसले यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती सोनाली थोबडे यांनी केले. या कार्यक्रमास प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ.रेखा पेंबर्ती, पर्यवेक्षक श्री. राहुल इंगळे सर्व शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.